सुरुवातीचा ट्रेनिंग चा कालावधी असो, की नंतरचं करिअर, नर्सिंग स्टाफ हा कायमच आम्हा डॉक्टर मंडळींचा तारणहार असतो. पहिली बातमी, परिस्थिती च अचूक वर्णन नेहमी आम्हाला त्यांच्याकडून मिळतं. जणू काही त्याच आमची एक्सटेंडेड पंचेंद्रियं असतात.
तुम्ही अनुभवी हाऊस ऑफिसर असताना, मॅरॅथॉन ड्यूट्या करत असताना पहाटे 3 ला थकलेल्या भागलेल्या असताना, जर हातून काही राहून गेलं असलं, तर त्याच ते निदर्शनाला आणून देतात – पुढचा अनर्थ टाळतात.
तुमच्या अपरोक्ष त्याच पेशंट ला धीर देत असतात, काय हवं नको पहात असतात. तुमच्या टीम मधलं त्यांचं योगदान हे अमूल्य असतं.
कधीही मी जर एखादा जीव वाचवण्यासाठी पळाले, तर ते आमच्या नर्स भगिनींनी बोलवल्यामुळे!!
मला आठवत आहे. एकदा एक डिलिव्हरी ची पेशंट होती. प्रचंड रक्तस्त्राव होत होता. आणि त्या परिस्थितीत तिला एका दुर्गम खेड्यातून हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करायचं होतं. भयंकर काळजीत पडले होते – कसं होणार, काय करायचं. पण माझ्याबरोबर असणाऱ्या अनुभवी नर्सना ‘ काय करायचं ‘, कसं पोहोचायचं, ते पक्क माहिती होतं.
असे असंख्य किस्से – अनुभव आहेत, जिथे चांगल्या नर्सिंग स्टाफ शिवाय आमचे हात, आमची मेहनत अपुरी पडली असती.
माझ्या सर्व नर्स भगिनींना मनापासून सलाम.
Dr Shalaka Shintre Shimpi
M.D.
(Obstetrician and gynaecologist)