#CovidDiaries – Soukhya Wellness

#CovidDiaries

फोन अचानक खणखणला,
वेळ: रात्री 2 वा
मॅडम जरा मदत हवी होती, आमच्या बिल्डिंग मध्ये एक गरोदर बाई आहेत, आठ महिने पूर्ण झालेत, covid positive आहे.
आज संध्याकाळपासून धाप लागलीये, ऍडमिट करायला सांगितलंय,
कुठे बेड मिळेल का बेड??
हे असले फोन…..
बेड, oxygen किंवा ICU care साठी, गेला महिना भर माझा किंवा मिस्टरांचा फोन वाजत आहे, आम्हाला जमेल तशी मदत करत आहोत, पण काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या आणि म्हणून ठरवलं की याबद्दल लिहायला हवय.
Covid ची दुसरी लाट आली तशी या वेळी गरोदर बायका आणि तरुण /मध्यमवयीन लोकांमध्ये बऱ्यापैकी infection पसरलं.
अगदी धडधाकट, ज्यांना काहीही
Co morbidities नाहीत, अशी लोकंही बघता बघता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊ लागली .
गरोदर स्त्रिया ज्यांचा फ़ार काही कोणाशी कॉन्टॅक्ट आला नाही त्यांनाही संसर्ग झाला.
ह्यामुळे प्रचंड भीती आणि panic सर्वत्र पसरल.
काही गोष्टी आपण सगळ्यांनीच समजून घ्यायला हव्यात.
जेव्हा तुमचे डॉक्टर टेस्ट करून घ्या सांगतात, तेव्हा ती लगेच करून घ्यायला हवी.
टेस्ट positive अली तर स्वतःला isolate करून आपण त्याचा संसर्ग थांबवू शकतो.
तेव्हा डॉक्टरांशी उगीच वाद घालत बसायचं… मला साधी सर्दीच झालीये, मला ताप आलाच नाही….. याला काही अर्थ नाही.
#Covidpositive reports आल्यावर तुमच्या डॉक्टरांनी जी औषधे/सूचना दिल्यात त्याचे काटेकोरपणे पालन करा,
आपल्या डॉक्टरांच्या सतत संपर्कात रहा.
जर ऍडमिट होयला सांगितलं तर लगेच ऍडमिट व्हा.
(Self medication अजिबात करू नका)
सध्याच्या Covid19 ह्या काळात अनेक नवनवीन प्रॉब्लेम्स आणि शंका घेऊन पेशंट्स येत आहेत
काही अगदी गमतीशीर वाटणारे आणि काही खरच खूप विचार करायला लावणारे.
आम्हा स्त्रीरोगतज्ञाना देखील हे एक challenge आहे कारण हा आजारच मुळी नवीन आहे आणि पुरेसे सौशोधन अजूनही नाही.
१. मॅडम, ह्या coronachya काळात आम्ही आता pregnancy plan करू शकतो का?
बाळाला काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना?
गेल्या वर्षी हा प्रश्न हिटलिस्टवर होता.
ह्याचे खरे उत्तर, “काही problem नाही” असे जरी असले, तरी देखील गरोदर स्त्री ला काही emergency अली तर, किंवा नेहमीच्या चेकउप आणि चाचण्या लागल्या तरी doctor कडे किंवा हॉस्पिटलमध्ये जावे लागते, तिथे बाकीचे patient, त्यांचे नातेवाहिक, अशे exposureआणि त्याच्या risks हे जाणून घेणे गरजेचे असते.
२. अजून एक महत्वाचा प्रश आला तो unwanted pregnancies चा.
Corona च्या काळात अशे बरेच फोन आले जेव्हा pregnancy आहे हे कळल्यावर त्या जोडप्याला गर्भपात करून हवा होता.
Sonography केल्या शिवाय आणि प्रत्यक्ष भेटून चेकउप आणि काही formalities पूर्ण केल्या शिवाय हे करता येत नाही.
आपण म्हणतो कितीही technology पुढे गेली असली तरी teleconsulting वर हे असले प्रॉब्लेम सुटत नाहीत.
मला एक किस्सा इथे आठवतो,
एका बाईचा राजस्थान च्या एका खेढ्यातून फोन आला, पाळी चुकली म्हणून.
तिच्या गावात एकाच मेडिकल चे दुकान होते तिथे preg test kit उपलब्ध न्हवते.
तेव्हा त्या गावात कडक lockdown होता .
फोनवर मी तिची फार जास्ती मदत करू शकले नाही.
काही आठवड्यानंतर जेव्हा तिला बाहेर पडून हॉस्पिटलमध्ये जाता आले, तेव्हा उशीर झाला होता आणि गर्भपात करण्याची वेळ निघून गेली होती.
३.covid च्या काळात असे काही अजून अनुभव आहेत जेव्हा काही स्त्रियांनी खूप अंगावर त्रास काढले आणि पूर्ण वर्ष घाबरून डॉक्टर कडे गेले नाहीत,
काही गर्भाशयाचे कर्करोग,
Ovarian tumours जे वेळच्यावेळी निदान करून त्यावर यशस्वी उपचार करून पूर्ण बरे होऊ शकले असते.
४. मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये एक अत्यंत क्लेशदायक अनुभव आला, जेव्हा माझी एक patient नव्यामहिन्यात covid positive अली, सक्तीचा14 दिवस quarantine आणि त्यातच तीचे बाळ पोटातच दगावले,.
Delivery साठी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये बेड available न्हवता.
5.असेही अनुभव आले जेव्हा patient नि मुद्दामून किंवा बेफिकरीने travel history लपवली, घरात कोणी positive असले तरी सांगितले नाही,अनेकदा सांगून सुद्धा स्वतःची test करणे नाकारले,……
एका patient च्या यजमानांनी तर माझाच Covid report मागितला🙄👅
६.पण याचबरोबर काही अत्यंत सुखद अनुभव पण सांगेन
वेळोवेळी “काळजी घ्या”असे येणारे फोन, सतत धीर देणारे आमचे असंख्य patients
घरी मुले एकटी असतील म्हणून खाऊचे डबे पोचवणार्या माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणी
ह्या सगळ्यांमुळे आम्हाला, ही लढाई लढू आणि जिंकू देखील, असा विश्वास आहे आणि ह्याच विश्वासावर आमचे अथक प्रयत्न चालू आहे.
तळ टीप :
pregnancy प्लॅन करणारे couples हे covid ची #लसघेऊशकतात.
Recomended by FOGSI
(Federation of Obstetrics and Gynecological Society of India)
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी,
still waiting for a nod from GOI.
It also says women should be counselled and empowered to make their own decision for vaccination
Though Fogsi recomends it.
Abroad they are giving it freely.
Dr. Shalaka Shintre Shimpi
M.D.
(Obstetrics and Gynaecology)