“सौख्य” चा अर्थ आहे सुख …समाधान.
सुखाची पहिली पायरी अस्ते निरोगी शरीर. आणि शरीर निरोगी तरच मन आनंदी .
निसर्गाने निर्मिलेला एक सुंदर आविष्कार म्हणजे “स्त्री”. काळाप्रमाणे – गरजेप्रमाणे सतत वेगवेगळ्या रूपांत वेगवेगळ्या भूमिकांत दिसणारी.
कधी अवखळ अल्लड बालिका असणारी लाडाची लेक गालांवर लालिमा चढलेली यौवना कधी होते, आपल्या स्वप्नांचा साथीदार शोधून अर्धांगिनी कधी होते, कुशीत थोपटणारं तान्हुलं निजवता निजवता आई कधी होते…
कधी मैत्रीण, कधी बहीण, कधी ड्रायव्हर, कधी हाऊस कीपर, कधी घरातली कर्ती कमावती, तर कधी हजारांची पोषिंदी…. सगळाच प्रवास “भन्नाट”
आणि हो, या सगळ्या भूमिकांतून जाताना तिच्या मध्ये होत असलेले शारीरिक आणि मानसिक बदल यांची वेळोवेळी आणि योग्य दखल घेतली जाणं ही देखील आपलीच जबाबदारी.
या प्रत्येक बदलाला सामोरं जाताना, मुलगी – स्त्री – आई ही रूपांतरणं अनुभवताना, ते बदल कमीत कमी क्लेशदायक व्हावेत; एवढंच नाही तर आनंददायी व्हावेत, सुखकारक व्हावेत, आणि या सगळ्यांची परिणती “सौख्य” प्राप्ती मध्ये व्हावी यासाठी काहीतरी “डेडिकेटेड” करण्याची माझी मनीषा होती.
त्या जोडीला
आहार आणि जीवनशैली चे व्यवस्थापन (Diet and lifestyle management)
वंध्यत्व (Infertility)
Sexual medicine
Urogynaecology
Adolescent clinic
वैवाहिक समुपदेशन (Marraige Counselling.)
हे सर्व एका छताखाली उपलब्ध व्हावं, म्हणून माझ्या मैत्रिणींसाठी, आया – बहिणींसाठी हा “सौख्य” चा खटाटोप.
माझ्या लिखाणातून मी जमेल तेवढी माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत असतेच असते, पण गरजे प्रमाणे प्रत्यक्ष भेट ही “आवश्यकच”.
अगदी वयात येताना ते मेनोपॉज या प्रवासात जरा जरी कधी शंका आल्या, अडचणी आल्या तर “सौख्य’ मध्ये आपलं स्वागत आहे.
मैत्रिणींनो…आपल्या सर्वांचे आयुष्य निरोगी, सुदृढ, आणि हो “सौख्यपूर्ण” व्हावे ही मनापासून सदिच्छा.
#नांदासौख्यभरे
Dr Shalaka Shintre Shimpi
M.D.
(Obstetrician and gynaecologist)